जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन आणि विवेक ठाकरे या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जामीन विरुद्ध प्रभावी युक्तिवाद केला होता.
बीएचआर घोटाळ्यात सीए जैनचा महत्वाचा सहभाग असल्याचा आरोप सरकारी पक्षाने केलेला आहे. सीए जैन यांनी समान न्याय तत्वाचा वापर न करता वेळोवेळी अवसायक जितेंद्र कंडारेला मदत केली आहे. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. सीए जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. तसेच यांच्या कार्यालातून जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स् मिळाल्याचाही पोलीस तपासात समोर आलेले आहे. दरम्यान, महावीर जैनसह ठाकरे या दोघांना डेक्कनच्या गुन्ह्यात जामीन मिळालेला आहे. परंतू शिक्रापूरच्या गुन्ह्यात या दोघांचा दोन दिवसापूर्वी अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे, अशी माहिती सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी दिलीय. दुसरीकडे मागील महिना (नोव्हेंबर) मध्ये मुख्य संशयित सुनील झंवरला मात्र, शिक्रापूरच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. परंतू डेक्कनच्या गुन्ह्याती झंवर अद्यापही येरवडा कारागृहातच आहे. तर याप्रकरणी आता २० डिसेंबरला पुढील सुनवाई होणार आहे.