जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सुरजची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयाने तब्बल ११ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. दुसऱ्या दिवसही त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते. परंतू सुरज झवरने बँक खाती गोठवू नका म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. दरम्यान, सुरजने संगनमत करून पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील करोडोच्या मालमत्ता कवडीमोल दरात खरेदी केल्याचेही पोलीस तपासात समोर आले होते. दुसरीकडे याआधी संशयित आरोपी धरम सांखला, सीए महावीर जैन, सुजित वाणी आणि विवेक ठाकरेचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.