जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आपणा केलेल्या कारवाईमुळे माझे पैसे मला परत मिळतील अशी आशा वाटत असून माझा आपणावर पूर्ण विश्वास आहे, अशा आशयाचे पत्र ठेवीदारांकडून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके पाठवले जात आहे. नवटके मॅडमांना पाठवलेले असेच एक पत्र येवला येथील एका ६० वर्षीय वृद्ध ठेवीदाराने ‘क्लिअर न्यूज’कडे पाठवले आहे.
नवटके मॅडमांनी एकाच वेळी राज्यातील विविध शहरात पाठवलेल्या १५ पथकांचे नेतृत्व करत हे धाडसी अटकसत्र राबवले. दरम्यान, या अटकसत्रामुळे संशयित आरोपींच्या मनात धडकी भरली आहे. तर दुसरीकडे मात्र, ठेवीदार खुश झाले असून नवटके मॅडमांचे अभिनंद करताय, या आशयाची बातमी ‘क्लिअर न्यूज’ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ठेवीदारांकडून नवटके मॅडमांना पाठवलेली पत्र आता समोर येत आहेत. अशाच आशयाचे एक पत्र उत्तम दशरथ बांगर (वय वर्षे ६०, धंदा शेती रा.मु.पो. मातुलठाण ता.येवला, जि. नाशिक) यांनी पाठवलेले आहे.
उत्तम बांगर यांनी नवटके मॅडमांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को. ऑप. सोसा. लि. जळगाव येथे श्री. अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितल्यानुसार २६,५०,०००/- (अक्षरी रक्कम सव्वीस लाख पन्नास हजार रूपये मात्र) च्या ओरीजनल ठेव (FD) पावत्या जमा केल्या आहेत.
कोणत्याही सरकारी-निमसरकारी अथवा को. ऑपरेटीव्ह अथवा मल्टीस्टेट संस्थांना कायद्यात ओरीजनल पावत्या ठेवून घेवून पैसे द्यावेत असे कुठेही नमुद नाही. श्री. कंडारे यांनी ओरीजनल पावत्या ठेवून घेवून मला फक्त रु.५०,०००/- दिलेले आहेत. ठेव पावत्यांच्या च्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडत आहे.
याबाबत मी नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्याकडे पैसे मिळणे बाबत अर्ज केला होता. त्या अर्जाची प्रत सोबत जोडत आहे. तसेच मे कंज्यूमर कोर्टात देखील दावा दाखल केला होता. त्या दाव्याची नोटीस सोबत जोडत आहे. सन २०१५ पासुन वारंवार सतत पैशांची मागणी करत आहे. परंतू समक्ष भेटूनही उपयोग होत नव्हता. नेहमी श्री. कंडारे (अवसायक) उडवाउडवीची उत्तरे देत होते. कोणत्याही अर्जाचे त्यांनी उत्तर दिलेले नाही. कदाचित अवसायक पदास पंतप्रधानांपेक्षा मोठी पोस्ट समजत असावे.
आपणाकडून केलेल्या कार्यवाहीची अनेक वृत्तपत्रांत बातमी वाचली आहे. आपण केलेल्या कार्यवाहीमुळे माझे पैसे मला परत मिळतील अशी आशा वाटत आहे. माझा आपणांवर पूर्ण विश्वास आहे. माझे वय ६० वर्षांच्या पुढे आहे तसंच बी.पी. तसेच वयोमानानुसार होणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त आहे. माझ्याकडून आता कोणताही कामधंदा होत नाही. सदरची रक्कम ही माझ्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी आहे. त्यावरच माझा आणि माझ्या पत्नीचा वृध्दापकाळ अवलंबून आहे.
भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट सोसायटीच्या महाराष्ट्रासह राजस्थान व मध्यप्रदेश मध्ये एकूण २५९ शाखा आहेत. त्यांनी गावातील प्रतिष्ठीत लोक गोळा करून शाखा समिती” म्हणून बोर्डावर नावं टाकुन बोर्ड प्रत्येक शाखेत लावला. त्यामुळे प्रतिष्ठीत लोकांच्या नांवाचा फायदा घेवून, लोकांनी विश्वास ठेवून ठेवी ठेवल्या होत्या. भाईचंद हिराचंद संचालक मंडळ सदर अफरातफरी केल्याप्रकरणी संपूर्णपणे … त्याचप्रमाणे समिती सदस्य यास जबाबदार धरून त्यांच्याकडून देखील पैसे वसूल करावे ही विनंती !