अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आमोदे येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून पाणीपुरवठा योजनेसह तब्बल 99 लक्ष ची महत्वपूर्ण विकास कामे मंजुर झाल्याने या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मा. जि.प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.
नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न सुटणार असल्याने आनंदीत झालेल्या ग्रामस्थांनी जल्लोषात जयश्री पाटील यांचे स्वागत व सत्कार केला.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून भूमीपूत्र आमदार आपल्याला लाभला असल्याने त्याचे फलित काय असते हे आपण विकास कामाच्या माध्यमातून अनुभवत असून जनतेची अशीच साथ कायम राहिल्यास तालुका आणि मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.याप्रसंगी पी.डी.सी. अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाऊंड बांधणे रक्कम 10.00 लक्ष, 2515 अंतर्गत प्रवेशद्वार बांधणे व चौक सुशोभिकरण करणे रक्कम 15.00 लक्ष, डी.पी.डी.सी.अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे रक्कम 22.00 लक्ष,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा रक्कम 52.00 लक्ष अश्या एकुण 99 लक्षच्या कामांचे भूमीपूजन जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, बाजार समिती प्रशासक सदस्य भागवत सुर्यवंशी, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज पाटील तसेच सरपंच रजनी सुरेश पाटील, उपसरपंच सुरेखा राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सविता राजेंद्र पाटील, अमोल राजू पारधी यांच्या सह एस.एन पाटील , भीवराज पाटील, नामदेव पाटील, दाजीबा पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील सुशील पाटील, प्रदीप पाटील मनोहर पाटील, रघुनाथ पाटील, संजय पाटील, नंदकिशोर पाटील, धनराज पाटील, अमृत काशीराम पाटील, राजू पारधी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचालन दिलीप बहिरम यांनी केले.