अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील शिरसोदे महाळपुर गावासाठी पाणी टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेती व सिंचनाकरिता आवश्यक असणारे नुकतेच लघुसिंचन मंत्रालयाकडून निधी मंजूर करून त्या कामांचा मतदारसंघात प्रत्यक्ष भूमिपूजन करून धडाका सुरू केला आहे. त्यात पारोळा तालुक्यातील शिरसोदे महाळपुर गावाजवळ बोरी नदीवर दोन गेटेड बंधारे व पूल आमदार निधीतून मंजूर करून त्या बंधाऱ्यांच्या व पुलाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.
पिंपळभैरव येथे पुलाचे काम सुरु झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना पारोळा जाण्यासाठी मार्ग नव्हता. त्यामुळे पिंपळभैरव येथे पुलाचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलतांना गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन बंधाऱ्यांना त्वरित मान्यता देऊन त्या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन केले. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले.
उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, महाळपुरचे सरपंच सुधाकर पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, उपसरपंच शालिक बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, राकेश गुरव, दिनेश मोरे, जिजाबराव पाटील, भिकन मालचे, विनोद महाजन, पप्पू मिर्झा, रामकृष्ण पाटील, वाल्मीक पाटील, मच्छिंद्र महाजन, रघुनाथ पाटील, गुलाब सहादू पाटील, अनिल सोनवणे, लोटन चौधरी, अनिल पाटील, महेश पाटील, पंढरीनाथ बागुल, जयकुमार पाटील, अमृत पवार, विनायक पाटील, रमेश गुरुजी, किशोर पाटील, भिकन कांबळे, श्यामदेव भिल, सागर पारधी, धर्मेंद्र पाटील, कैलास पाटील, प्रभाकर पाटील, हिम्मत चौधरी, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.