कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) आज एरंडोल शहरात युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील गेल्या तीस वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रामचंद्र नगर, सावतामाळी नगर, ओम नगर, ओमशांती केंद्र येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले की, मागील कारकिर्दीत आपण एरंडोल शहराचा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला हद्दवाढीचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवला. समाविष्ट झालेल्या नवीन वसाहतींच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन देशील केले. परंतू दुर्दैवाने निवडणुकीत पराभव झाल्याने व मागील लोकप्रतिनिधींनी त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने त्या समस्या दुर्लक्षित राहिल्या. मात्र पुन्हा शहरवासीयांनी आपल्यावर विश्वास दाखविल्यामुळे आपण त्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार आहोत व विकासकामांसाठीचा निधी हा योग्य ठिकाणी अपेक्षित जनतेच्या सोयीसुविधांसाठी वापरून नवीन वसाहतींच्या विकासासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भरीव निधीची मागणी करणार असल्याचेही आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले. एरंडोल शहराच्या इतिहासात आमदार निधीतून आजपर्यंत सर्वाधिक कामे केल्याचा आपणांस अभिमान आहे, असेही आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
यावेळी विकास कामे होत असलेल्या भागातील नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार करून होऊ घातलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, पारोळा बाजार समितीचे सभापती अमोलदादा पाटील, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जि. प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, नगरसेवक कुणाल महाजन, युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन, नगरसेवक नितीन बिर्ला, आनंदा चौधरी, राजेंद्र महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, पुंडलिक पवार, इंगळे, गोरख चौधरी, परेश बिर्ला, सुनिल मराठे, अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, मयूर महाजन, कृष्णा ओतारी, चंदू जोहरी, रवींद्र महाजन, प्रसाद महाजन आदी उपस्थित होते.