भुसावळ (प्रतिनिधी) येथील बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असतांनाही स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही म्हणून जळगाव येथील निरीक्षकांसह चौघांना निलंबीत करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ येथे बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या भरारी पथकाने दि.१७ जुलै रोजी केली होती. कारवाईत ११ लाख ४६ हजार ७०० रुपयांची दारू पकडल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील राज्य विभागाचे निरीक्षक आय.एन.वाघ, दुय्यम निरीक्षक के.बी.मुळे, जवान एस.एस. निकम व एन. बी. पवार या चौघांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी रात्री हे आदेश जारी केले. दरम्यान, याप्रकरणी अधीक्षक सीमा झावरे यांच्यावरही कारवाईची होण्याची शक्यता आहे.