जळगाव (प्रतिनिधी) भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनिल राखंडे यांच्यावर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली केली. ही घटना बुधवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. दोघं मयतांचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. सुमारे चार तास चाललेल्या शवविच्छेदनामध्ये दोघांच्या शरिरात अडकलेल्या तब्बल ९ गोळ्या काढण्यात आल्या.
मृतदेहाचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन !
जून्या वादासह पाण्याच्या टँकरवरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनिल राखुंडे हे त्यांच्या वाहनाने जळगावकडून भुसावळकडे येत होते. दरम्यान, मंदिराजवळ थांबवून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुमारे दहा मिनिट सुरु असलेल्या गोळीबार च्या घटनेत हल्लेखोरांनी बारसे आणि राखुंडे यांच्यावर सुमारे ३० ते ३२ राऊंड फायर केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला होता. त्यामुळे मयतांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
शहरातील गोळ्या काढण्यासाठी काढण्यात आला एक्सरे !
फॉरन्सिक विभागाच्या पथकाने केले शवविच्छेदन मयतांचे शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागातील चार तज्ञ्ज डॉक्टरांचे पथक तयार झाले. त्यापुर्वी मयतांच्या मृतदेहांमध्ये अडकलेल्या गोळ्या काढण्यासाठी त्यांचा एक्सरे काढण्यात आला. त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास शवविच्छेदनाला सुरुवात केली.
जिल्हा रुग्णालयात तणाव !
गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. रात्रीपासून जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर सकाळी शवविच्छेदनाला सुरुवात असतांना देखील जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त जिल्हा रुग्णालयात रात्रीपासून मयतांचे नातेवाईकांसह समर्थकांची गर्दी होत होती. त्यामुळे सकाळी क्यूआरटी आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात धाव घेत पाहणी करीत सुचना दिल्या.
शवविच्छेदनासाठी सुमारे चार तासांपेक्षा अधिकचा वेळ !
हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या डोक्यात चार बुलेट मिळून आल्या, त्यातील एक बुलेट ही आरपार निघालेली होती. तर सुनिल राखुंडे यांच्या शरिरातून पाच बुलेट मिळून आल्या. यामध्ये त्यांच्या डोक्यातून दोन, पोटातून दोन तर पाठीतून एक अशा बुलेट काढण्यात आल्या. या बुलेट संपूर्ण शरिरात अडकल्यामुळे शवविच्छेदनासाठी सुमारे चार तासांपेक्षा अधिकचा वेळ लागला. त्यानंतर पावणेसहा वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर ते भुसावळच्या दिशेने रवाना झालेत.