भुसावळ (प्रतिनिधी) अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर महसूल प्रशासनाने कारवाई करीत डंपर जप्त केला आहे. शिवाय त्यातील एक ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली. ही कारवाई 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास साकेगाव गावाजवळील जोगलखेडा रस्त्यावर करण्यात आली.
कुर्हेपानाचे मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्या फिर्यादीनुसार, साकेगाव गावाजवळील जोगलखेडा रस्त्यावरील वॉटर फिल्टर हाऊसजवळ डंपर (एमडब्ल्यूडी 9728) ची तपासणी केली असता त्यात दोन हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू आढळली मात्र चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने वाळू चोरीची असल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी डंपर चालक संदीप बाळू सपकाळे (साकेगाव, ता.भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच डंपर जप्त करण्यात आले. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.