भुसावळ (प्रतिनिधी) मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडला. भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. डोक्यावर व गळ्यावर वार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस अधिकार्यांची धाव
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचार्यांनी दुपारी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ट्रामा सेंटरला हलवण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील हे देखील पल्या पथकासह पोहचले आहेत.