भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडवेदिगरनजीक कॅशियरकडील 12 लाखांची रोकड पिस्टलाच्या धाकावर लूटण्यात आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याची उकल करण्यात भुसावळातील बाजारपेठ, तालुका व जळगाव गुन्हे शाखेला यश आले आहे.
या गुन्ह्यात चार आरोपींचा सहभाग आढळला असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जळगावात पत्रकार परीषदेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली. दरम्यान, अटकेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सागर बबन हुसळे (फेकरी, ता.भुसावळ व अतुल दीपक खेडकर (लहुजी नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांचे बोलेरो वाहन व लुटीतील दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.