भुसावळ (प्रतिनिधी) आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ओबीसी आघाडीच्या परखड वक्त्यांची यादी पक्षाकडे दिली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेसह राज्यातील आठ जणांचा समावेश आहे.
राज्यात १०५ नगरपंचायती व भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी मतदार होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पुढाऱ्यांच्या प्रवासी खर्चास सूट मिळण्याच्या हेतूने २० स्टार प्रचारकांच्या यादीस निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात येते. ज्या स्टार प्रचारकास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यांच्या समवेत ओबीसी आघाडीच्या वक्त्यांना प्रचारक म्हणून सभांना बोलवावे असे गर्जे यांनी सुचवले आहे. या यादीत भुसावळचे उमेश नेमाडे यांचा समावेश आहे.