मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेली १२ आमदारांची यादी अद्याप राज्यपालांनी मंजूर केलेली नाही. त्यामुळे नवीन राज्य सरकार आपल्या सरकारमधील उमेदवारांची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकनाथ शिंदे सरकार १२ आमदारांची नवीन यादी राज्यपालांना सुपूर्त करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीतील नावे ही त्या त्या क्षेत्रातील नसल्याने राज्यपालांनी यादी अडवून ठेवली होती. यामुळे आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीका देखील केली होती. यामुळे राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यातला संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे नवीन सरकार आता पुन्हा नवीन यादी राज्यपालांकडे देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नव्या यादीत नेमकी कोणाची नावं असतील?, याबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे.