मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कालच खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची मालमत्ता ईडीने जप्त केली. एएनआयच्या वृत्तानुसार, ईडीने फेमा, १९९९ च्या तरतुदींनुसार पीसी फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (NBFC) च्या पेमेंट गेटवेसह बँक खाती आणि व्हर्च्यूअल खात्यांमध्ये असलेले १०६.९३ कोटी रुपये जप्त केले आहेत.