मुंबई (वृत्तसंस्था) आज दुपारी दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.
तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणूक ही नेहमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी एकत्रच होत आली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार का याबाबत उत्सुकता आहे.