मुंबई (वृत्तसंस्था) नगरपालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला असून यामुळे लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात जिल्ह्यातील १५ नगरपालिकांचा समावेश आहे. त्यानुसार आता १० मार्च रोजी प्रारूप तर १ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या पार्श्वभूमिवर, आज राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकांमधील सर्वात महत्वाचा घटक असणाऱ्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार राज्यातील अ, ब आणि क वर्गात येणाऱ्या नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यात अ वर्ग नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असून आयोग याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे. यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल. जिल्हाधिकारी याला २५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवतील. तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील.
दरम्यान, ब आणि क वर्गातील नगरपालिकांसाठी हाच कार्यक्रम असून यात राज्य निवडणूक आयोगाकडे नव्हे तर पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अर्थात, यासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी २ मार्चपर्यंत प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार असून ते याला ७ मार्च २०२२ रोजी मान्यता देणार आहे. यावर १० ते १७ मार्चच्या दरम्यान हरकती घेता येतील. यावरील सुनावणी २२ मार्च रोजी होईल. तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता मिळणार आहे. हीच प्रभाग रचना जिल्हाधिकारी ५ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करतील. यामुळे निवडणुका एप्रिलचा अखेरचा आठवडा अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता, भुसावळ ही अ वर्गातील नगरपालिका असून यासोबत अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, रावेर, सावदा, यावल आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद येथे निवडणुका होणार आहेत.
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
दि.2 मार्च प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे. दि.) मार्च प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकान्याकडून मान्य मिळणे,
हरकती व सुचना
दि.10 मार्च प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागवण्यासाठी वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे.
दि. 10 ते 17 मार्च- हरकती व सुचना मागविणे. दि.22 मार्च हरकती व सुचनावर सुणावणी.
दि.25 मार्च हरकती व सुचनाच्या अनुषंगाने अभिप्राय देवून संबंधित विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्याकडे अहवाल पाठवणे.
दि. एप्रिल अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे