जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निर्बध शिथील व टाळेबंदी टप्याटप्प्याने उठविणे (मिशन बिगीन अगेन) संदर्भात तसेच कोविड-१९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व प्रशिक्षण संस्था (लाईट हाऊस, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सींग) बाबतचे मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहुन २१ जानेवारी, २०२१ पासुन सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सुरु करणेस परवानगी देण्यात येत आहे. प्रशिक्षण संस्था तसेच Coaching classes यांनी कोविड -१९ चा प्रसारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. या संस्थांनी प्रशिक्षणार्थीची प्रवेश करताना थर्मल गनव्दारे नियमित तपासणी करावी, मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सर्व संस्थामधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड -१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी, या संस्थांनी प्रवेशव्दारावर तसेच प्रशिक्षण हॉमध्ये सॅनिटायझर मशीन उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. दोन प्रशिक्षणार्थीमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात येऊन सोशल डिस्टन्सीग (Social Distancing) चे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशान्वये वेळोवेळी निर्गतिम केलेले आदेश/ मार्गदर्शक सुचना पुढील आदेशापर्यत लागु राहतील.
कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सुचनाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.