TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

सोने चांदीसह रोकड नेली चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
May 13, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) –  शहरातील वाघ नगरातील संभाजी चौक परिसरात बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून सोने चांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना दि. १० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्रीमध्ये तीन घरे चोरट्यांनी फोडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील वाघ नगरातील राजे संभाजी चौकात शिवदास हंसराज नाईक (वय ५७) हे वास्तव्यास असून ते आदिवासी प्रकल्प कार्यालयात उपलेखापाल म्हणून नोकरीस आहे. भाडेतत्वार राहत असलेल्या घराशेजारी शिवदास नाईक यांचे घर असून ते त्याठिकाणी सामान शिफ्ट करीत आहे. दि. १० मे रोजी ११ वाजेच्या सुमारास नाईक हे ते राहत असलेल्या घराला कुलूप लावून स्वतःच्या घरात झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ते भाडेतत्वावर राहत असलेल्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात शिरले. त्यानंतर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी सोन्याचे पदक, अंगठी, चांदीची पायल असा ऐवज चोरुन नेला. दि. ११ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नाईक यांना जाग आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

गावाहून परतल्यानंतर घटना उघडकीस

शिवदास नाईक यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता, त्यांना काही अंतरावर राहणाऱ्या भूषण साहेबराव पाटील हे बाहेरगावी गेलेले असतांना त्यांच्या घरात देखील चोरी झाल्याचे समजले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी चांदीच्या साडेचार भाराच्या तीन मुर्ती आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. भूषण पाटील हे घरी परतल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याची खात्री झाली.

एका घरातून चोरटे रिकाम्या हाती परतले

चोरट्यांनी भूषण पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांच्या शेजारील बंद असलेल्या जावेद सकावत तडवी यांच्या घरात देखील डल्ला मारला. गावाहून आल्यानंतर तडवी यांनी घरात पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी तेथून काहीही चोरुन नेले नसल्याचे तडवी यांनी सांगितले.

चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज

चोरट्यांनी शिवदास नाईक यांच्या घरातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १० भार वजनाच्या पायल, ४ हजार रुपये रोख तर भूषण पाटील यांच्या घरातून साडेचार भार वजनाच्या तीन मुर्ती आणि २ हजार रुपये रोख असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

नियोजित गस्त नसल्याने चोरट्यांनी बंद घरे केली टार्गेट

एकाच रात्री तीन बंद असलेल्या घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस ठाण्यापासून हा परिसर अत्यंत दूर असल्यामुळे रात्रीची गस्त याठिकाणी नियमीत होत नाही, त्यामुळे चोरटे या परिसरातील घरांना लक्ष्य करीत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGang of thieves breaks into three locked houses in Raje Sambhaji Chowk in Wagh Nagar

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024

संस्कृती मंत्रालय, भारत सरकारतर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा

January 5, 2022

वराड बू. येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

July 28, 2023

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार ; आरोपीची आत्महत्या !

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group