नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी (Gyanvapi Mosque Case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) वाराणसी कोर्टाला आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी म्हणजेच उद्या ही सुनावणी होणार आहे.
याबाबत वकील विष्णू शंकर जैन यांनी दिवाणी न्यायालयात फिर्यादींचे प्रतिनिधित्व करणारे वकील हरी शंकर जैन यांना कालच रुग्णालयातून उपचारानंतर घरी साेडण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापर्यंत स्थगिती देण्याची विनंती न्यायालयास केली. दरम्यान मस्जिद समितीतर्फे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी सादर केले की, ट्रायल कोर्ट (वाराणसी दिवाणी न्यायालय) आज मशिदीच्या वजुखानाची भिंत बदलण्याची मागणी करणाऱ्या अर्जांवर सुनावणी करत आहे आणि सुनावणी पुढे ढकलत असल्यास कार्यवाही स्थगित करावी अशी विनंती न्यायालयास केली.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जैन यांनी या प्रकरणी उद्या सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले. तसेच आज न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरमसिम्हा यांच्या खंडपीठाने वाराणसी न्यायालयाने दिलेल्या सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या मस्जिद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देताना वाराणसी दिवाणी न्यायालयाला या प्रकरणात आज कोणताही आदेश देऊ नये असे निर्देश दिले.