मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, येत्या चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना जाहीर करावी आणि त्यानंतर पुढील चार महिन्यांच्या आत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी.
या निर्देशामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह अन्य महत्त्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची निवड वेळेत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.