जळगाव (प्रतिनधी) चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकताच पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीच्या सोळा मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
सुनिल शामराव भिल (रा. पिंप्री सीम ता.एरंडोल), खुशाल ऊर्फ भैय्या राजु पाटील (रा. नागदुली ता.एरंडोल), गोविंदा अभिमन्यु कोळी (रा. नागदुली ता.एरंडोल) आणि हर्षल विनोद राजपुत (रा.मोहाडी ता.पाचोरा) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकुण सोळा मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून जळगाव जिल्ह्यासह जामनेर वगळता इतर सर्व मोटार सायकली बुलढाणा, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यांसह काही गुजरात राज्यातील आहेत. या सोळा मोटार सायकली 7 लाख 60 हजार रुपये किमतीच्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सपोनि निलेश राजपुत, पोउनि गणेश वाघमारे, गणेश चोबे, सफौ अनिल जाधव, हे.कॉ. संदिप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल देशमुख, प्रितम पाटील, पो.ना. भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चापोना अशोक पाटील, चापोकॉ मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.