यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरपावली येथे आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनाअंतर्गत न्यूट्रिटीव्ह स्लाईज (बिस्कीट) वाटप कार्यक्रम जि.प. मराठी आणि जि.प. उर्दू शाळेत गावचे प्रथम नागरिक विलास नारायण अडकमोल यांच्या शुभहस्ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने माजी सरपंच जलील सत्तार पटेल, उपसरपंच प्रतिनिधी समाजसेवक मुक्तार पटेल, ग्राप सदस्य सिकंदर तडवी, आरिफ तडवी, मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी, निवृत्ती भिरुड, जाकीर शाह, अस्लम तडवी, कुतूबुद्दीन, फिरोज तडवी, भरत चौधरी, हाजी हारून पटेल, मुनाफ तडवी, रहुप पटेल तर पालक म्हणून भुरा मिस्त्री, रामा अडकमोल, सुरेंद्र पांडव, नीलिमा भालेराव, आलिशान तडवी, अमिना तडवीसह शिक्षक विद्यार्थी गावकरी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.