भुसावळ (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांना हात जोडून देखील दखल न घेतल्यामुळे भाजपचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावून चोपही दिला. या घटनेमुळे भुसावळमध्ये खळबळ उडाली आहे.
भुसावळ येथे शहरातील प्रभाग क्र. २० मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या ८ दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील दोन तीन नागरिक या गड्यांमध्ये पडले होते. त्यामुळे हे काम तातडीने करून खड्डा बुजवावा अशी विनंती येथील स्थानिक सत्ताधारी भाजप पक्षाचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी ३ दिवसांपूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती. मात्र, अधिकाऱ्यांना हात जोडून देखील दखल न घेतल्याने नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना या गड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावून चोप दिला. ३ दिवसापूर्वी प्रभाग क्र. २० चे महेंद्र सिंग ठाकूर यांनी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती केली होती. तसंच तातडीने काम करून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज अमृत योजनेच्या या अधिकाऱ्याला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न महेंद्र सिंग ठाकूर यांनी केला.