उत्तर प्रदेश (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये काल ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. परंतु योगी आदित्यनाथांची सत्ता असलेल्या या राज्यात भाजपाला शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका बसला असून कलांमध्ये बागपत आणि मथुरा जिह्यांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. तर बागपत आणि मथुरामध्ये जाटांची कल बदलला आहे. मात्र अद्याप अन्य जिल्ह्यांचे निकाल हाती येणे बाकी आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कलांमध्ये बागपत आणि मथुरा जिह्यांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. अद्याप अन्य जिल्ह्यांचे निकाल हाती येणे बाकी आहे. बागपत आणि मथुरामध्ये जाटांची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये जाटांची ताकद आहे. असे झाल्यास जाटलँडमध्ये भाजपा आपले वर्चस्व गमावत असून अजित सिंह यांचा पक्ष आरएलडी त्याच वेगाने जाटांमध्ये ताकद वाढवू लागली आहे.
या दोन जिल्ह्यांसारखेच जर मुझफ्फरनगर, सहारनपूर, शामली, देवबंद आणि अलीगढमध्ये देखील जाटांमुळे भाजपा निवडणूक हरत असेल तर शेतकऱ्यांनी जाट आणि मुस्लिम समाजाची मोट बांधून भाजपाचा खेळ केला असे म्हणावे लागेल. सध्यातरी निकाल हाती येण्यास आणखी काही तास लागणार आहेत, मात्र, बागपत आणि मथुरा याकडे इशारा करत आहेत की, भाजपाने शेतकरी आंदोलनानंतर खूप काही गमावले आहे. बागपतमध्ये आरएलडीचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि भाजपा खूप मागे पडली आहे. मथुरामध्ये निम्म्य़ा जागांवर आरएलडी पुढे आहे. हे अंतिम निकाल नाहीत, तर सुरुवातीचे कल आहेत.