मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी अमली पदार्थविरोधी एनसीबी पथकाने धाड टाकली आहे. एएनआयने याविषयी वृत्त दिलं आहे.
एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोधमोहीम सुरु आहे. त्यातच ड्रग पेडलरच्या माहितीवरुन एनसीबीने भारतीच्या घरी छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. अलिकडेच अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील एनसीबीने चौकशी केली आहे.

















