जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित प्रेसिडेंट पॅलेस, जळगाव येथे भारतीय जनता पक्ष, जळगाव तर्फे आयोजित “परिवार संवाद” कार्यक्रमात भाजप परिवारातील कार्यकर्त्यांशी गडकरी व माजी मंत्री गिरीषजी महाजन यांनी संवाद साधला.
तसेच यावेळी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू व विद्यार्थ्यांचे माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.