जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या एका कार्यकर्त्याने आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या वाहनावर दगड फेकल्याची घटना शुक्रवारी रात्री भाजपच्या बैठकीनंतर घडली. या घटनेनंतर भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नाही. संबंधित व्यक्ती मद्यपी तथा मनोरुग्ण होती, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. तर कुणीही तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असं पोलिसांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी रात्री भाजपची बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच एका कार्यकर्ता दरवाजाच्या समोर लोळायला लागला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी त्याला बाजूला नेले. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगडफेकला. अशा आशयाची एक क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली. या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नाही. संबंधित व्यक्ती मद्यपी तथा मनोरुग्ण होती, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. तर गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर आमचे दोन कर्मचारी गेले होते. परंतू संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला होता. विजय पवार नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो त्यांचाच कार्यकर्ता होता. परंतू कुणीही तक्रार न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.