धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठ हायस्कुलच्या प्रांगणात भाजप जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी खा. उन्मेषदादा पाटील, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
मेळाव्याचे उदघाटक म्हणून खासदार उन्मेषदादा पाटील होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार स्मिताताई वाघ, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, प्रल्हाद पाटील, जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, हभप जळकेकर महाराज, माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, जिल्हासरचिटणीस मधुकर काटे, सचिन पानपाटील, राकेश पाटील,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,गोपाळ भंगाळे,प्रभाकर पवार,शेखरदादा अत्तरदे,प.स.हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, ता.सरचिटणीस सुनील पाटील व ललित येवले, जळगाव ता. सरचिटणीस अरुण सपकाळे व संदिप पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, तालुका बुथसंयोजक कन्हैया रायपूरकर, जि.प.सदस्य गजानन नाना सांब, प.स उपसभापती गोपाल चौधरी व ज्योतिताई पाटील, जि.प.सदस्य वैशाली पाटील, मार्केट कमिटी संचालक एस.पी.पाटील, महारु पाटील, तालुकाध्यक्ष जगन महाजन, शेतकी संघ व्हा.चेअरमन भगवान बापू,अनिल सांडू पाटील, किसान मोर्चा जि. सरचिटणीस गुलाबबाबा पाटील, शिरिषआप्पा बयास, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष निर्दोष पवार, रमेश पाटील, किशोर झंवर, माजी सभापती पुनीलाआप्पा महाजन, ता.उपाध्यक्ष संगीता सुरेश पाटील, संदेश झंवर, राकेश नंनवरे, सुनील बडगुजर, प्रवीण माधवराव पाटील, ईश्वर सावंत, मुन्ना भाऊ, दिपक पाटील, विजय रामदास पाटील, पिंटू पाटील, शालीक अप्पा, नाना बळीराम पाटील, गुलाब महाजन, धनराज महाजन, मधुबाबा सतखेडा, यांच्यासह सरपंच व उपसरपंच सदस्य व कार्यकर्त्यांचा उपस्थितीत संपन्न झाला.
पक्षसंघटनेसाठी खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन राजुमामा भोळे व पदाधिकाऱ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विधितज्ञ तालुकाध्यक्षपदी अँड.हरीहर पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्षपदी डॉ.विजय पाटील बोरखेडा, साईदास राठोड पिंप्री, संतोष महाजन अनोरे, रमेश दोडे पिंप्री, तुकाराम भिल अनोरे, महिला शहरअध्यक्षपदी ज्योती गुलाब लांबोळे, उपाध्यक्षपदी श्रीराम महाजन, शेतकरी आघाडीवर देवा रोकडे, ओबीसी तालुकाउपाध्यक्षपदी रवींद्र पाटील, गोपाळ सोनवणे मुसळी, अजय पाटील पिंपळेसिम, शे.फारुख शेख, गोपाळ पांडे, अतुल पाटील पिंपळे यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
श्याम भिका पाटील, वसंत सोनवणे ग्रा.प.सदस्य (भोद), चोरगाव येथील हसरत दामू सोनवणे, लक्ष्मण पवार, लताबाई सोनवणे (ग्रा.पं. सदस्य), लक्ष्मण सोनवणे, कैलास सोनवणे, शिवदास सोनवणे, शांतीलाल इंगळे, मंगल सोनवणे, बापू सोनवणे, सुभाष सोनवणे, धनराज सोनवणे, सुनील सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, पांडुरंग सोनवणे, देविदास सोनवणे, पंढरीनाथ बळीराम पवार, किरण सोनवणे, देविदास सोनवणे, गोरख सोनवणे, गोंविंद सोनवणे, अशोक सोनवणे, धनराज सोनवणे, इत्यादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यानीं भाजप मध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी केले. मेळाव्यास उपस्थित निर्दोष पवार सोनवद, किशोर झंवर चोरगाव, डॉ. विजय पाटील बोरखेडा, तुषार पाटील वराड, सुनील बडगुजर पिंप्री, यांनी कार्यकर्त्यांना कशा अडचणी निर्माण केल्या जातात यासंदर्भात माहिती पदाधिकर्यांकडे तीव्र भावना व्यक्त केल्यात. जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटील यांनी आढावा घेतला.
यानंतर भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांनी सोनवद पिंप्री मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेने १९९२ पासून ते २०१७ पर्यंत पाच पंचवार्षिक भाजपाचे कमळ फुलवण्याचे काम केले, असे म्हणत असताना २०१७ मध्ये झालेल्या निसटता पराभवाने आमच्या काही चुका व कार्यकर्त्यांचा अति आत्मविश्वासामुळे झाल्याचे सांगितले. तरी कार्यकर्ता संयमी असून सत्ताधाऱ्यांचा आमिषाला बळी न पडता भाजपच्या मागे खंबीरपणे उभा आहे. पालकमंत्र्याचा कामगिरीवर नाराजी व्यक्त करत पूर्वीच्या तालुक्यातील आमदार सिताराम भाई बिर्ला, गिरणा नदी पाणी तालुका झाला, दिगंबर यांनी वसंत साखर कारखाना, महेंद्रबापू यांनी अंजनी धरण, पद्मालय धरण, पारूताईंनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, देवकर अप्पांनी यांनी धरणगाव-म्हसावद उड्डाणपूल, जळगाव-धरणगाव तालुका जोडणारा पूल. परंतू दुसरीकडे ४ पंचवार्षिक पासून आमदार राहिलेल्या मंत्री व पालकमंत्र्यांनी असं कोणतं ठोस काम केले?, असा सवाल केला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून ८९ गावांपैकी खऱ्या अर्थाने आवश्यक असलेल्या ३७ गावांना संपर्कात येईल, असे रस्ते डांबरीकरण व नदीवर पुलांचे काम केले. १४/१५ वित्त आयोग निधी, मनरेगा निधी, ग्रा.प.ला केंद्राकडून मिळतो. पंतप्रधान घरकुल आवास योजना निधी, शाळा खोल्या वाल कंपाउंड निधीत MREGS व वित्तआयोगाचा मोठा हिस्सा आहे. जलजीवन मिशनमध्ये केंद्राचा ६० टक्के हिस्सा आहे, असे प्रतिपादन करत गुलाबराव पाटलांना आव्हान देत अंजनीधरण व पद्मालय धरण पूर्ण करून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवावा.
जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले, जि.प च्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात कामे करण्यासह सर्वाना मदत करण्याची हमी दिली. ह.भ.प.जळकेकर महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची माहिती देत गुलाबराव पाटील हे बहुजन समाजाला कसे संपवत आहेत व तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत, असे सांगत गुलाबराव पाटलांचे वाभाडे काढत समाचार घेतला.
सुभाष अण्णा पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात तोफ डागत पाळधीची घाणीचे साम्राज्य व धरणगाव, पाळधी पाणी प्रश्नावर भाष्य केले. अँड. संजय महाजन यांनी धरणगावचा पाणी प्रश्नी २०/२० दिवसात होणारा पाणी प्रश्न मांडत पालकमंत्र्याचा खोट्या आश्वासनांची पोलखोल करत तालुक्यातील अवैद्य धंदे व त्यामागील त्यांचे साटेलोटे यावर भाष्य केले.
उन्मेषदादा पाटील यांनी आपल्या भाषणातून केंद्राच्या योजना उज्वला योजना, शेतकरी मानधन, मनरेगा १५ वा वित्त आयोग, रेल्वे बोगद्यांची कामे, विमा योजना, मुद्रा योजना अशा अनेक योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना ”ड” यादीतील गैरकारभाराचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच तालुका प्रशासनकडून केंद्राच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा व कार्यकर्त्यांना त्रास देत असतील तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. पाणीपुरवठा योजनांमध्ये केंद्राचा ६०टक्के वाटा असतांना पालकमंत्री स्वतः टिमकी वाजवत फिरतात हे आम्ही खपवून घेणार नाहीत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुमामा भोळे यांनी आपल्या भाषणातून प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले. कोणावर अन्याय होत असेल तर निश्चितच सांगा, भाजप ही राष्ट्रहित जोपासणारी पार्टी आहे. नरेंद्र भाईचे हात बळकट करण्यासाठी सर्व गावागावात गल्लीगल्लीत केंद्राची कामांची माहीती द्या. आपासातील हेवेदावे विसरून कामाला लागा असे राजू मामांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सुनिल पाटील यांनी तर आभार युवा मोर्चा अध्यक्ष निर्दोष पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, तालुकासरचिटणीस ललित येवले, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कार्यसंयोजक कन्हैया रायपूरकर, सुनील चौधरी, शालीक तायडे, मंगल राधेश्याम पाटील आदींसह कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. सदरील मेळाव्यात सोनवद पिंप्री गट व तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.