मुक्ताईनगर (प्रतिनिधी) लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना व घरगुती ग्राहकांना तांत्रिक पडताळणी नकरता आकारण्यात आलेल्या भरमसाठ वीजबिल विरोधात भाजपा मुक्ताईनगरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले व मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना तहसिलदार मुक्ताईनगर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. त्यात तत्काळ लॉकडाऊन काळात आलेल्या वीजबिलाची सरसकट माफी देण्याची मागणी करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीजबिलांचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या उर्जामंत्र्यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावीच लागतील, असे स्वतः स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसून करण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जि.प.सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, नगराध्यक्षा नजमाताई तडवी, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सरपंच तथा नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद दिनकर पाटील वढोदा, गुणवंत शांताराम पिवटे तरोडा, प्रभाकर भागवत महाजन पातोंडी, निखिल गणपत महाजन पातोंडी, साहेबराव नामदेव पाटील सुळे, शकील खान करीम खान बेलसवाडी, विजय काठोके, भाजयुमो शहर उपाध्यक्ष रहस्य महाजन व शेतकरी ग्राहक व कार्यकर्ते उपस्थित होते.