सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील वैभववाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत ठिय्या आंदोलन केल. तसेच भाजप कार्याकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रारीची कबुली दिली आहे.भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळं एका अधिकाऱ्याने चक्क आंदोलनस्थळी जमिनीवर नाक घासत माफी मागितली.
जिल्ह्यातील वैभववाडी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीज वितरण कार्यालयासमोर आज भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. भाजप कार्याकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रारीची कबुली दिली आहे.
वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना मुदत द्या, कोरोना काळातील वाढीव बिले माफ करा, कोरोनामुळे नागरिक त्रस्त असल्याने ग्राहकांना तगादा लावू नका अश्या मागण्या भाजपने केल्या. त्यानंतर
महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील वीज बिल फरक याचे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. तर कनेक्शन देण्याकरीता टाळाटाळ केली व पैशांची मागणी केली, असा आरोप भाजपने केला होता. आरोपांवर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रारीची कबुली दिली व माफी मागितली आहे.