बोदवड (प्रतिनिधी) येथील बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या १८६ उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. त्यात ११ अर्ज नामंजूर करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एक अर्ज सहकारी संस्था मतदारसंघातील तर दहा अर्ज ग्रामपंचायत मतदारसंघातील आहेत. नामंजूर झालेले अर्ज पुढील प्रमाणे सहकारी संस्था मतदारसंघ पाटील जगदीश तुकाराम, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ बेंडाळे अक्षय दिलीप,पाटील नितीन नाना,बोरसे संगीता अनिल,पाटील ज्ञानेश्वर दिगंबर,पाटील मनीषा अजयसिंग,पाटील विक्रमसिंग मुकुटराव,ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ पाटील भीमराव परबत, बोरसे संगीता अनिल,ग्रामपंचायत अनु. जाती जमाती मतदार संघ कोंगळे इंदूबाई पवन,तांबे पांडुरंग गणेश, या उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.