बोदवड (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व शिवसेना(शिंदे गट) व भाजपचे शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.
आमदार एकनाथराव खडसे सकाळी नऊ वाजेपासून नाडगाव रस्त्यावरील दाल मिलमध्ये आघाडीच्या चर्चा करण्यासाठी ठाण मांडून बसले होते. मात्र, जागा वाटपात काँग्रेसची ताकद कमी असल्यामुळे त्यांना कमी जागा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली. परंतु हा प्रस्ताव काँगेसला मान्य न झाल्याने आघाडी होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने चर्चा करतांना आडमुठी भूमिका घेऊन आधी कबूल केलेल्या जागा न देता कमी जागांचा प्रस्ताव समोर ठेवला व काँग्रेसचे उमेदवार सुद्धा आम्हीच ठरवू अशी भूमिका घेतली व आघाडी होऊ दिली नाही, ही आमची फसवणूक झाली. त्यामुळे आम्ही काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला व आमच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते विरेंद्रसिंग पाटील यांनी दिली.
आज माघारीच्या दिवशी एकूण १६९ पैकी १२५ अर्ज माघार घेण्यात आले. आता निवडणूक रिंगणात असलेल्या दोनही पॅनलचे उमेदवारांची यादी खालील प्रमाणे. भाजपा शिवसेना युतीच्या शेतकरी परिवर्तन चे बाजार समिती निवडणुकीत उमेदवार असे आहेत विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ वसंत एकनाथ राणे- भाजप, विश्वास राजाराम जनरल-सेना,,विनायक चावदस चौधरी-सेना,,योगेश संतोष पाटील-सेना,,संजय भावराव पाटील -सेना,अनंता मधुकर पाटील-सेना, वैभव साहेबराव पाटील-भाजप,भटके विमुक्त जाती जमाती अनिल प्रभाकर वंजारी-भाजप, इतर मागास वर्ग आनंदराव रामराव देशमुख-सेना,महीला राखीव मतदार संघ मंगलाबाई समाधान वलकर-सेना, सगिता संतोष पाटील-सेना, ग्रामपंचायत मतदार संघ:अनुसुचित जाती जमाती राखीव जयपाल विरसिगं बोदडे-भाजप, आर्थिक दुर्बल घटक सुर्यकांत अभिमन्यू पाटील-सेना, व्यापारी मतदार संघ मनोज नथमल जैन-सेना हमाल मापाडी मतदार संघ शांताराम रामकृष्ण कोळी-सेना ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ, शरदराव माणिकराव पाटील-सेना, पंकज अशोक राणे-सेना, असे उमेदवार शिवसेना भाजप युतीचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार
विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ सुधीर रामदास तराळ,अंकुश राजेंद्र चौधरी,राजेंद्र सोनू फिरके, ज्ञानेश्वर अशोक पाटील, आसाराम नामदेव काजळे, किशोर वसंत भंगाळे, योगेश आत्माराम पाटील, महीला राखीव मतदार संघ आशाबाई भागवत टिकारे, जिजाबाई प्रविण कांडेलकर, इतर मागास वर्ग मतदार संघ, ईश्वर शंकरराव महाले, भटके विमुक्त जाती जमाती, विजय भावराव पाटील, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ रामभाऊ शंकर पाटील, दत्ता गणेश पाटील,अनुसूचित जाती जमाती मतदार संघ धनजंय सुरेश एदलाबादकर, आर्थिक दुर्बल घटक गणेश सिताराम पाटील, व्यापारी मतदार संघ माणकचंद खुपचंद अग्रवाल, अनिल मधुकर चौधरी,हमाल मापाडी मतदार संघ,गोपाल संतोष माळी या व्यतिरिक्त आठ उमेदवार अपक्ष आहेत. त्यात काही उमेदवार वेळेत माघार घेऊ न शकल्याने राहिले आहेत.
३० एप्रिल रोजी मतदान होणार व निकाल
आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाजार समिती आवारात कार्यकत्यांना थोडा वेळ भेट दिली .राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, भाजपचे अशोक कांडेलकर, नंदू महाजन, वरणगाव माजी नगराध्यक्ष सुनील काळे, काँग्रेसचे डॉ जगदीश पाटील, निरीक्षक संजय पाटील, विरेंद्रसिंग पाटील हे बाजार समितीचे आवारात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी एम आर शहा, सहाय्यक एम बी गाढे व बाजार समिती सचिव विशाल चौधरी व मदतनीस ईसहार शेख , तुषार चिचोले योगेश सुर्यवंशी यांनी काम पाहिले २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप होऊन ३० एप्रिल रोजी मतदान होणार व निकाल सुध्दा याच दिवशी लागणार आहे.