बोदवड (प्रतिनिधी) येथील कला ,वाणिज्य व विज्ञान बोदवड येथे दिनांक ११ सप्टेंबर रोजी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी शास्त्रोत्सव दिन साजरा केला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी आजकाल नाविण्यपूर्ण जे काही घडतंय त्यामागे विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे असे आपल्या मनोगतात सांगितले. कौशल्य , वेळेचे नियोजन व साधनांचा योग्य वापर हे गुण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्ये भरभरून असून त्यांच्या या गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होईल असे सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.पी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व विज्ञान शाखेच्या प्राध्यापकांचा पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे परिचय करून देत कार्यक्रमाला सुरुवात झाली. गीत गायन, खेळ ,शेलापागोटे अशा विविध कार्यक्रमांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शास्त्रोत्सव समिती प्रमुख डॉ. गीता पाटील ,डॉ. नरेंद्र जोशी, कंचन दमाडे , विशाल जोशी ,डॉ. रूपाली तायडे, संदीप बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले. याप्रसंगी विज्ञान शाखेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.