बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रौढास अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील एका गावातील १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीस संशयित आरोपी बाळू उर्फ नेनु धना सोयसे (वय ५०) याने अल्पवयीन मुलीला अण्णाभाऊ साठे महामंडळाकडुन आर्थिक लाभ मिळावा म्हणून प्रकरण करुन देतो, असे खोटे आमिष दाखवले होते. संशयित आरोपीने ४ ऑगस्ट 22 रोजी दुपारी अंदाजे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास जुना शेतामधील रुममध्ये पिडीत मुलीचा तिचा हात पकडुन तिला रुममध्ये नेत मनास लज्जा उत्पन्न पोहचनार या उद्देशाने तिच्या सोबत अंगलट केले. तसेच तिच्या मोबाईल फोनमध्ये फोटो काढले.
पिडीत मुलीने घरी आल्यावर तिच्या आजीस सांगितल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी बोदवड पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आजीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाळू सोयशे याच्या विरुद्ध गु.र.नं. 154/2022 भा.द.वि.क. 354, 354 (अ) सह कलम बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संध्याकाळी संशयित आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे आदेशानुसार स.पो.नि.अंकुश जाधव हे करीत आहेत.