बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मनुर बु. येथील निवृत्ती सोपान ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष जळगाव रावेर लोकसभा उमेश नेमाडे यांनी ढोले यांना नियुक्तीपत्र दिले.
यावेळी संजय पाटील, संतोष सिंग राणा हे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महाराष्ट्राचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिलदादा पाटील यांना अभिप्रेत असणारी संघटना, बांधण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहाल. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत तसेच प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी व त्यांच्या उत्थानासाठी आपले सहकार्य राहील,असा विश्वास या नियुक्ती प्रसंगी जिल्हाध्यक्ष नेमाडे यांनी व्यक्त केला.