बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत असून एका गावात सदस्यपदासाठीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज झालेल्या माघारीनंतर सरपंचपदासाठी २५ तर सदस्यासाठी १०१ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
येवती ग्रामपंचायतसाठी लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असून या जागेसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. तर अकरा सदस्यांच्या जागा असून येथे प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेवरकेसरबाई शिवदास भिल बिनविरोध असून उर्वरीत दहा जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. गोळेगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिला असून या पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.
नऊ सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जमाती प्रवर्गात इंगळे शारदा अविनाश या बिनविरोध असून उर्वरीत आठ जागांसाठी सतरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कुऱ्हा हरदो गट ग्रामपंचायतसाठी लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असून या पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. नऊ सदस्य जागांपैकी प्रभाग तीन गोफणे लताबाई काशिनाथ अनुसूचित जाती महिला,प्रभाग एक पारधी निर्मला सुभाष अनुसूचित जमाती महिला या बिनविरोध झाल्या असून, उर्वरीत सात जागांसाठी सोळा उमेदवार रिंगणात आहेत. जलचक्र बु।। -खुर्द गट ग्रामपंचायतसाठी लोकनियुक्त सरपंचपद सर्वसाधारण महिला राखीव असून निवडणुकीत चार उमेदवार रिंगणात आहेत व नऊ सदस्य जागांपैकी जलचक्र गट ग्रामपंचायत प्रभाग तीनमधून सर्वसाधारण पुरुष जागेवर राजू सदाशिव पाटील सर्वसाधारण पुरुष असून उर्वरीत आठ जागांसाठी २२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
नव्याने निर्माण झालेल्या पळासखेड ग्रामपंचायतसाठी सरपंचपद सर्वसाधारण असून पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत नऊ सदस्य जागांपैकी प्रभाग एक मधून सर्वसाधारण महिला लक्ष्मीबाई हिरासिंग राठोड. प्रभाग दोन मधून पाटील सरला उत्तम या बिनविरोध झाल्या असून उर्वरीत सात जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. करंजी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुसूचित जमाती साठी एकही अर्ज नाही ,या जागेवर तिसऱ्यांदा निवडणूक घोषित केलेली होती. परंतु गावात जात प्रमाणपत्र नसल्याने ही जागा रिक्त राहत आहे.