जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर सिल्व्हर पॅलेस हॉटेलसमोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर सिल्व्हर पॅलेस हॉटेलसमोर सोमवारी सकाळी ९ वाजता अनोळखी व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडला असल्याचे ये-जा करणार्या नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी तत्काळ रिक्षातून अनोळखी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मयताची ओळख पटलेली नाही. मयताचे वय अंदाज ५० वर्ष असे असून शरीराने सडपातळ, रंग सावळा, उजव्या हाताचे कमरेवर रतलाल असे गोंधलेले, अंगात पांढर्या निळ्या ग्रे हिरव्या रंगाचे हाफ बाहीचे टीशर्ट व डाव्या पायाच्या पंजाचे वर काळा डाग असे त्याचे वर्णन आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र परदेशी यांनी केले आहे. कुणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.