मुंबई (वृत्तसंस्थाा) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लागवला आहे. “सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू… हे बच्चन स्टाईल बोलबच्चन ऐकून हल्ली लोकांचे मनोरंजन सुद्धा होत नाही. शेवटाची चिंता करू नका, महाराष्ट्राची जनता तुमच्या खोरडेपणाचा व्यवस्थित शेवट करेलच, त्याची सुरुवात झालेली आहे. २०२२ मध्ये ट्रेलर पाहायला मिळेलच,” असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला.
“आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिलं होतं. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. “सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू… हे बच्चन स्टाईल बोलबच्चन ऐकून हल्ली लोकांचे मनोरंजन सुद्धा होत नाही. शेवटाची चिंता करू नका, महाराष्ट्राची जनता तुमच्या खोरडेपणाचा व्यवस्थित शेवट करेलच, त्याची सुरुवात झालेली आहे. २०२२ मध्ये ट्रेलर पाहायला मिळेलच,” असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते राऊत?
“काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. यंत्रणांचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.