जामनेर (प्रतिनिधी) शहरातील सुतार गल्लीतील घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ८० हजाराचे सोने-चांदी मोतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, शहरातील सुतार गल्लीतील विनोदकुमार जवाहर लोढा (धंदा, व्यापार रा. मोहन भुवन नगर, सुतार गल्ली) यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी सोने-चांदी आणि मोतीचे दागिने तसेच रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते हे करीत आहेत.