TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड ड्रग केसमध्ये एनसीबीने अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलं होतं. शादाबच्या चौकशीतूनच अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. अखेर त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.

एनसीबीचं पथक एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला यांसारख्या अनेक ठिकाणी छापेमारी केली असून अद्यापही एनसीबीची कारवाई सुरु आहे. एजाज खान आज राजस्थानमधून मुंबईमध्ये दाखल झाला होता, तेव्हा विमानतळावरूनच त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. जवळपास २ कोटी रुपयांचे ड्रग्ज त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आले होते. शादाब बटाटावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवण्याचा आरोप आहे. फारूख पूर्वी बटाटे विकत होता. त्यावेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि सध्या तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर म्हणून ओळखला जातो. ड्रग्जच्या या जाळ्यातील सर्व कामं सध्या त्याची दोन्ही मुलं पाहतात.

READ ALSO

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

बिग बॉसमधून झाला होता आऊट!

एजाज खानला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. शोच्या नियमानुसार स्पर्धक एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत. मात्र, शोदरम्यान एजाज खानने एका स्पर्धकावर वादावादीमध्ये हात उचलल्यामुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. द कपिल शर्मा शोमध्ये देखील एजाज खाननं वाद घातल्याचं समोर आलं होतं. रक्त चरित्र २, अल्ला के बंदे अशा सिनेमांमध्ये एजाज खानने भूमिका साकारली आहे. २००३ मध्ये आलेल्या पथ सिनेमामधून त्यानं सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर लम्हे या सिनेमात देखील त्याने व्यक्तीरेखा साकारली होती.

अभिनेता अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता होती : NCB

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संबंधी तपास करणाऱ्या NCB ने अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी सुरु केली होती. या दरम्यान NCB अशी शंका होती की अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तशा आशयाचे एक पत्रही NCB ने दक्षिण आफ्रिकेच्या काऊन्सलेट जनरलला लिहिले होते. NCB च्या चार्जशीटमधून हा खुलासा झाला आहे.

अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्याच्या घरातून काही गोळ्या आणि इतर सामान NCB ने जप्त केलं होतं. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली होती. या दरम्यान, अर्जुन रामपाल भारत सोडून दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता NCB ला होती. NCB बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असून अजूनही अर्जुन NCB च्या रडारवर आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने १३ नोव्हेंबरला बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली होती. ही चौकशी सुरु असताना अर्जुन रामपालचा विदेशी मित्र पॉल गियर्डला अटक करण्यात आली होती. त्याआधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रायडिसची सलग दोन दिवस चौकशी केली होती.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : महावीर जैनच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण ; जामिनाला सरकार पक्षाचा विरोध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील आयएमएच्या वतीने सत्कार !

September 18, 2023

तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

September 2, 2021

अधिकारी, ठेकेदारांविरुद्ध न्यायालयात दाद मागणार – उपजिल्हाप्रमुख अॅड शरद माळी

May 14, 2025

जळगावात एटीटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला !

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group