कुन्नूर (वृत्तसंस्था) केरळमधील एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर आज सकाळी बॉम्ब हल्ला झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
केरळमधील जिल्ह्यातील पय्यानूर गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर आज सकाळी बॉम्ब हल्ला झाला आहे. अज्ञातांनी कार्यालयावर बॉम्ब फेकला. त्यामुळे कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. पय्यान्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळीच ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.