काबूल (वृत्तसंस्था) काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला. काबूलमधील एका शैक्षणिक केंद्राबाहेर शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले.
अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवून आणला. तसेच तालिबानने या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.