भटिंडा (वृत्तसंस्था) पंजाबमधील भटिंडा येथील मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून ही घटना पहाटे ४.३५ ची आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मिलिट्री स्टेशनवर हा हल्ला झालाय की सैन्यातल्याच कोणीतरी हा हल्ला केल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीय. या हल्ल्यानंतर शीघ्र कृती दलाने परिसराचा ताबा घेतला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याचबरोबर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आता गोळीबार थांबला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. भंटिडा लष्करी तळावर झालेला गोळीवार हा दहशतवादी हल्ला नसल्याचे भंटिडाचे एसएसपी यांनी स्पष्ट केले आहे. भटिंडाचे मिलिट्री स्टेशन हे खूप जुने आहे. पूर्वी ते शहराच्या बाहेर होते. परंतू, जसजसा शहराचा विस्तार होत गेला आता ते शहरात आले आहे. कोणत्याही सामान्य वाहनाद्वारे मिलिट्री स्टेशनच्या बाहेरपर्यंत जाता येते. परंतू, कडक सुरक्षा असल्याने बाहेरील व्यक्ती आत घुसू शकत नाही. यामुळे सैन्य अधिकाऱ्यांतील आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचा अंदाज लावला जात आहे.