जळगाव (प्रतिनिधी) विविध गुन्हे करून समाजात दहशत माजविणारे एकूण ७ आरोपींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळया स्वरुपाचे गुन्हे करणारे व समाजात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची माहिती संकलीत करुन त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेकामी मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या होत्या. त्यानुसार किसन नजनपाटील यांनी पोलीस अंमलदार सफौ. युनूस इब्राहीम शेख, पोहेकॉ. पंडीत सुनिल दामोदरे, पोना.रविंद्र रमेश पाटील अशांना आदेशीत करुन पथकामार्फत पोलीस ठाण्याकडून आरोपींचे गुन्हे अभिलेखाची माहिती प्राप्त करुन पुरिपुर्ण माहितीयुक्त प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे करुन समाजात दहशत माजविणारे एकूण ७ आरोपीतांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.
यांना केलेय हद्दपार !
रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील विशाल भिका कोळी (रा. पिंप्राळा जळगाव) यास दोन वर्षांसाठी तसेच सावदा पोस्टे. हद्दीतील १) सै. ईकबाल उर्फ सै. भुया अल्लाऊद्दीन (रा. रविवार पेठ सावदा), २) शे. रईस उर्फ मास शे. ईस्माईल रा.गाशिया नगर (सावदा), ३) शे. जाबीर शे. खलील (रा. ख्वाजा नगर सावदा), रावेर पोस्टे. हद्दीतील १) विनोद विठ्ठल सातव (रा. रावेर), २) तुळशिराम सुभाष सावळे (रा. कजद ता. रावेर) व निंभोरा पोस्टे. हद्दीतील सुनिल श्रावण चव्हाण (रा. ऐनपूर ता. रावेर) यांना प्रत्येकी एक वर्ष कालावधीसाठी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.