TheClearNews.Com
Wednesday, July 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

"विद्या ही केवळ गुणांपुरती मर्यादित नको; ती विचारात आणि कृतीत उतरवा" – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2025
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी): माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या गौरव समारंभात पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उंच भरारी घ्या, पण पाय जमिनीवर ठेवा. यशाच्या शिखरावर पोहोचताना नम्रता हीच खरी साथ देणारी असते. WhatsAppवर वेळ दवडू नका, ‘What’s next’ याचा विचार करा. विद्या ही केवळ गुणांपुरती मर्यादित न ठेवता ती विचारात, कृतीत आणि वागण्यात उतरवली पाहिजे.”

READ ALSO

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

या कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना महात्मा गांधींची मूर्ती, सुताचा हार व अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंतांचा गौरव
दहावी परीक्षेतील गुणवंतांमध्ये महाराष्ट्र मंडळातून प्रसन्न हिम्मत चौधरी (100%), जेनिशा गेही (99.60%), वेदिका क्षत्रिय (99.40%), रोहन संदीप पाटील (99.00%), पूर्व पाटील व चैताली पाटील (98.80%) यांचा समावेश आहे.

बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत अदिती सोनार (92.67%), कला शाखेत अख्तर बेग मिझ (91.33%), वाणिज्य शाखेत अभिषेक जैन (97.33%) हे विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. सीबीएसई बोर्डातून मानसी वायकोळे (99.40%), तनिष्का अग्रवाल (98.80%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.

आदिवासी गटातील गंगावती वळवी (90.40%), अनुसूचित जाती-जमातीतील पियुष जाधव (79.20%), तसेच अनाथाश्रमातील वैशाली हिवराळे व दामिनी महाजन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांशी संवाद
पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “पुढे काय होणार?” असा प्रश्न विचारला असता, बहुतेकांनी डॉक्टर, इंजिनीयर होण्याची इच्छा व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा संकल्प बोलून दाखवला. मात्र, राजकीय क्षेत्रात येण्याची तयारी फार कमी असल्याचे दिसून आले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले, “राजकारणात हुशार तरुणांची गरज आहे. तुम्ही पुढे आलात, तर समाज बदलू शकतो.” त्यावर एका विद्यार्थ्याने राजकारणात येण्याची उत्सुकता व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना बोलतं केलं. त्यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीनंतर पालकांचा ओढा कॉलेजपेक्षा क्लासेसकडे अधिक असतो, याकडे लक्ष वेधून हा कल थांबवण्याची गरज व्यक्त केली. पालकमंत्र्यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत शासन स्तरावर यासंदर्भात चिंतन सुरू असल्याचे सांगितले.

गौरव समारंभाचा उद्देश
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणे व पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळणे, हा जिल्हा परिषदेमार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समारंभाच्या समाप्तीनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGuardian Minister felicitates meritorious students of Jalgaon district who achieved success in 10th and 12th classes

Related Posts

जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
जळगाव

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

July 6, 2026
Next Post

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर ८ वर्ष अत्याचार !

April 26, 2022

भडगाव हादरलं : सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !

February 5, 2022

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

June 9, 2021

धक्कादायक : पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य, तरी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार !

January 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group