TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

खत, बी, बियाणे कंपनीकडून लिंकिंग केल्यास जिल्ह्यात होणार सक्त कारवाई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी, बियाणे याबाबत कोणतीही लिंकिंग केल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला. याबरोबरच बनावट बियाणे विरोधात कारवाईसाठी जिल्ह्यात 15 तालुक्यात प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर एक असे एकूण 16 भरारी पथक स्थापन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्ह्यातील जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असून टंचाई होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेतली जाईल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, खत-बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

या बैठकीत जिल्ह्यातील खरीप हंगामासाठीची पेरणी क्षेत्र, बियाणे व खते उपलब्धता, सिंचन सुविधा, पीककर्ज वाटप, फळबाग लागवड, पीक विमा योजना आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यंदा 7.69 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार असून, त्यापैकी 5.05 लाख हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी आरक्षित आहे.

पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश :
बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.

हवामान यंत्रणा अद्ययावत करून आवश्यक ठिकाणी नवीन यंत्रे बसवावीत. सध्या जिल्ह्यात 86 स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यरत असून, आणखी 24 ठिकाणी केंद्रे उभारली जाणार आहेत.

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, 251 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी 3.39 लाख मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर असून, सध्या 1.45 लाख मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा नियोजनबद्ध व वेळेत पुरवठा सुनिश्चित करावा.

शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी 1800 233 4000 हा टोल फ्री क्रमांक प्रभावीपणे कार्यान्वित ठेवावा.

“एक अधिकारी, एक गाव” अभियानांतर्गत जनजागृती शिबिरे आयोजित करावीत.

आधुनिक शेतीबाबत कार्यशाळा घेऊन पारंपरिक शेतीतून आधुनिकतेकडे वाटचाल करावी.

“कुकुंबर मोझॅक व्हायरस” संदर्भात पावसाळी हंगामात जनजागृती मोहीम राबवावी.

“एक जिल्हा – एक पिक” (केळी प्रक्रिया आधारित) या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.

बैठकीत आत्महत्याग्रस्त व अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मोफत बियाणे व खते देण्यासंदर्भातील कार्यवाही, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, ठिबक सिंचनाचे अनुदान, गाळमुक्त धरण-जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी, मनरेगाअंतर्गत कामे, तसेच सौर कृषी पंप जोडणीस गती देण्याबाबत सखोल चर्चा झाली.

महावितरण विभागाला शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. बागायती कपाशी पिकासाठी खराब ट्रान्सफॉर्मर व पोल तातडीने दुरुस्त करावेत, असे आदेशही देण्यात आले.

शेतकरी बांधवांसाठी पालकमंत्र्यांचे आवाहन :
उष्णतेपासून बचावासाठी सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करावीत. 100 मिमी पावसाच्या नोंदीनंतरच पेरणी करावी. बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी व धूळपेरणी टाळावी. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करावा व जैविक खतांना प्राधान्य द्यावे. बोगस कंपन्यांपासून सावध राहून बी-बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना उद्देशून केले.

आ. अमोल पाटील व आ. अमोल जावळे यांनीही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत, बोगस कंपन्यांविरोधात तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावर कृषी विभागाने राज्यस्तरावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी खरीप हंगामाचे पूर्ण नियोजनाचे सादरीकरण केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रमजान पर्वालाला शासकीय नियमानुसार सुरुवात

April 14, 2021

रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास? ; काँग्रेसची मोदींवर सडकून टीका !

March 6, 2022

बीएचआर ठेवीदाराची ठेव रक्कम तहसिलदारमार्फत वसुलीचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आदेश

March 11, 2022

बीएचआर घोटाळा : पावत्यांच्या २० टक्के रक्कम भरुन ११ संशयित कारागृहातून बाहेर !

July 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group