जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावच्या प्रेम नारायण कोकटा या आणखी एका संशयित आरोपीला पुण्याच्या एका हॉटेलमधून अटक केली आहे. दरम्यान, आज अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता आठ झाली आहे.
विचार घोटाळ्यात सात आरोपींना अटक केल्यानंतर आता पुन्हा प्रेम नारायण कोटा जळगाव या संशयित आरोपीला पुण्यातील रिटझ कार्लटॉन या हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे आज पहाटे मात्र, जळगाव जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकसत्र राबविले. यात भागवत भंगाळे (जळगाव) छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील जामनेर यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ, जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.
या सर्व आरोपींना जिल्हापेठ पोलिस ठाण्यातून वैद्यकीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले जाईल आणि त्यानंतर हे पथक लागलीच पुण्याकडे रवाना होणार असल्याचे कळते.