जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे याचा ड्रायव्हर कमलाकर कोळी याला आज पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जावर ११ जानेवारीला निकाल देण्यात येणार आहे. तसेच विवेक ठाकरे यांच्या जामीन अर्जावर दि. ६ तर सीए महावीर जैन यांच्या जमीन अर्जावर ११ तारखेलाच सुनवाई होणार आहे. कोळी, ठाकरे आणि वाणी यांच्यावतीने अॅड. उमेश रघुवंशी यांनी कामकाज पहिले.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ डिसेंबर रोजी जळगावात छापेमारी करुन दोन ट्रक कागदपत्रे, संगणक जप्त करुन नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सीए महावीर जैन, विवेक ठाकरे व सुजित वाणी व कमलाकर कोळी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. त्यावर १६ डिसेंबरला सुनावणी होणार होती. परंतू, काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यानुसार आज (दी.५) रोजी न्ययालयाने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित कंडारेच्या ड्रायव्हरला जामीन दिला. तर सुजित वाणीच्या जामीन अर्जावर ११ जानेवारीला निकाल देण्यात येणार आहे. तसेच . तसेच विवेक ठाकरे यांच्या जामीन अर्जावर दि. ६ तर सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर ११ तारखेलाच सुनवाई होणार आहे. आज सरकारी पक्षाने महावीर जैन यांच्या युक्तिवादासाठी वेळ मागून घेतल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर ११ तारखेलाच सुनवाई होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवरसह इतर संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नसून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.