जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे पथक जळगाव धडकल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयचे पथक शुक्रवारपासून जळगावात आले असून एका राजकीय गुन्ह्याशी संबंधित तपासासाठी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Cbi Team In Jalgaon)
सीबीआयच्या पथकात पथकात एक एसपी, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक दर्जाचे प्रत्येकी एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील एका शासकीय गृहात हे पथक थांबले असून एका राजकीय गुन्ह्याशी संबंधित विविध कागदपत्र तसेच माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे कळते. दरम्यान सीबीआयचे पथक जळगाव धडकल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खडबड उडाली आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दाखल खोट्या गुन्ह्यासंबंधी तपासासाठी सीबीआयचे पथक जळगाव धडकले असल्याचे कळते. सीबीआयचे [पथक जळगाव आले असल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी देखील दुजोरा दिला आहे.
जळगाव इथल्या मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या या घटनेचा निंभोरा इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित पेनड्राइव्ह बॉम्ब सभागृहात फोडला होता. ज्यामध्ये गिरीश महाजन विरुद्ध केसेस कशा दाखल केल्या?, महाजनांना कसं फसवलं?, अगदी तत्कालीन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे? ह्या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण पेनड्राइव्हमध्ये होते. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवासांनी विधानसभेत केली होती. सरकार बदलल्यावर हे प्रकरण हे सीबीआयकडे गेले होते. त्या अनुषंगाने सीबीआयचे पथक जळगावात आले असल्याचे कळते. सीबीआयच्या पथकाने काही दिवसापूर्वी पुणे येथे काही जणांचे जबाब नोंदवले असल्याचेही कळते.