नागपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला (RSS Office Nagpur) बाँबने उडविण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राज्यासह देशात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच सचिन कुलकर्णी नावाच्या इसमाने संघ मुख्यालय उडविण्याची धमकी दिली होती. त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली होती. यावेळीसुध्दा पोलिसांना अशाच प्रकारचा संशय आहे.
ख्यालयात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात निनावी दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्याने व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात बॉम्बस्फोट घडविणार असल्याची धमकी दिली. यानंतर नियंत्रण कक्षाने लगेच पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठांना माहिती दिली. लगेचच संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच यंत्रणा सतर्क झाल्या असून क्युआरटी कमांडोसह पोलिसांच्या तुकड्या संघ मुख्यालयात पाठविण्यात आल्याआहेत. पोलिसांनुसार महाल भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला उडविण्याची धमकी देण्यात आली आहे.
बाँब विरोधी पथक आणि डॉग स्काड टीम पाचारण
घटनेची माहिती मिळताच बाँब विरोधी पथक आणि डॉग स्काड टीमला पाचारण करण्यात आलं होते. आरएसएस मुख्यालय परिसरात तपासणी सुरू करण्यात आली. परंतु, काहीही संदिग्ध सापडलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, पॅट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. पोलीस फोन करणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी लोकेशन स्ट्रेस करत आहेत. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. झोन तीनचे डीसीपी गोरख भामरे यांनी सांगितलं की, पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी एक वाजता फोन आल्याची माहिती दिली आहे.
लिसांनी मुख्यालयाची सुरक्षा वाढविली !
पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी लगेच संघ मुख्यालय गाठत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचे शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, संघ मुख्यालय उडविण्याची धमकीचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यालयाची सुरक्षा वाढविली आहे.
















